लोक घरी यायचे, मी लपून बसायचो! Champions Trophy गाजवलेल्या वरुण चक्रवर्तीला मिळालेली धमकी, स्वत: केला गौप्यस्फोट

नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर हिंदुस्थानच्या संघाने नाव कोरले. हिंदुस्थानने न्यूझीलंडचा पराभव करत तब्बल 12 वर्षाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयामध्ये हिंदुस्थानचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने महत्त्वाचे योगदान दिले. याच वरुण चक्रवर्ती याने आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2021 मध्ये टी-20 वर्ल्डकपममध्ये कामगिरी यथायथा राहिल्यानंतर आपल्याला धमकीचे फोन आले होते, असा दावा वरुणने केला आहे.

2021 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानी संघाने लवकर गाशा गुंडाळला होता. त्या वर्ल्डकपमध्ये वरुणने 3 सामने खेळले होते, मात्र त्याला एकही विकेट घेतला आली नव्हती. याच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने हिंदुस्थानला 10 विकेटने पराभूत केले होते. कोणत्याही वर्ल्डकपमधील हिंदुस्थानचा हा पाकिस्तानविरुद्ध पहिला पराभव होता. यानंतर आता आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपले असे वरुणला वाटत होते.

युट्यूबवर प्रसिद्ध अँकर गोबीनाथ यांना दिलेल्या मुलाखतीत वरुणने सांगितले की, 2021 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर मला धमकीचे फोन येत होते. हिंदुस्थानात येऊ नको, अशी धमकी मला देण्यात आली होती. लोक माझ्या घरीही येत होते. त्यांच्या हाती लागू नये म्हणून मी लपूनही बसायचो. विमानतळावरून येताना काही लोकांनी माझा पाठलागही केला होता.

तो माझ्या आयुष्यातील वाईट काळ होता. मला नैराश्याने ग्रासले होते. मी माझ्या निवडीला न्याय देऊ शकलो नाही, असे मला वाटत होते. मी वर्ल्डकपमध्ये एकही विकेट घेऊ शकलो नव्हतो, त्यामुळे माझेच मन मला खात होते. त्यानंतर तीन वर्ष माझी हिंदुस्थानच्या संघात निवड झाली नाही. माझे कमबॅक अशक्य आहे असेच मला वाटत होते, असेही वरुणने सांगितले.

आयपीएलचे नेतृत्व देशी झाले! दहापैकी नऊ संघांच्या नेतृत्वपदी हिंदुस्थानचे धडाकेबाज खेळाडू

मला स्वत:मध्ये खूप बदल करावा लागला. मी माझे रुटीन बदलले, सरावाची पद्धत बदलली. आधी मी एका सत्रात 50 चेंडूंचा सराव करायचो, तो मी दुप्पट केला. मला वाटायचं की आता माझी निवड होणार नाही. पण तीन वर्षानंतर आम्ही आयपीएल जिंकले आणि मला पुन्हा निवड समितीचा फोन आला, असे वरुणने सांगितले.

एकाच दिवसात कसोटी, वनडे आणि टी-20 सामना खेळण्याची धमक फक्त टीम इंडियामध्ये; ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाची स्तुतीसुमने