हे अतिच होतंय… 22 वर्षीय विद्यार्थिनीनं 18 कोटींना विकलं कौमार्य, हॉलीवूड अभिनेत्यानं खरेदी केल्याचा दावा

सध्या वस्तू ऑनलाईन विकत घेण्याचा आणि घरातील जुन्या वस्तू किंवा एक-दोनदा वापरलेल्या पण नव्याकोऱ्या दिसणाऱ्या वस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. अनेकदा आपण पाहिले असेल की लोक घर, गाडी, ऐतिहासिक वस्तू, नाणी यासह ज्वेलरीचाही लिलाव करतात. पण तुम्ही कधी एखाद्या मुलीने स्वत:चे कौमार्य लिलाव करून विकल्याचे ऐकले का? नाही ना, पण अशीच एक घटना ब्रिटनच्या मँचेस्टर येथे समोर आली आहे. लॉरा नावाच्या एका 22 वर्षीय विद्यार्थिनीने चक्क आपले कौमार्य विकून खळबळ उडवली आहे.

लॉरा नावाच्या या तरुणीने स्वत:च्या कौमार्याचा ऑनलाईन लिलाव केला. या लिलावामध्ये अनेक बडे उद्योजक, प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी आणि कलाकारही सहभागी झाले होते. अखेर एका प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्याने तब्बल 18 कोटी रुपये मोजून लॉराचे कौमार्य खरेदी केले. अर्थात हा अभिनेता कोण हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

लॉरा म्हणते, मला पश्चाताप नाही!

एकीकडे लॉरावर टीका होत असताना दुसरीकडे तिने आपल्याला याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले आहे. अनेक महिला कोणत्याही आर्थिक किंवा भावनिक लाभाशिवाय त्यांचे कौमार्य गमावतात. मी माझे भविष्य सुरक्षित केले असून मला हे पैसे माझ्या करिअरसाठी वापरायचे आहे. त्यासाठी कौमार्य विकण्याचा निर्णय योग्य आहे, असे लॉरा म्हणाली. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

लक्झरी जीवन जगायचंय

लॉरा म्हणते, या पैशातून मला ऐशोरामात जगायचे आहे. यासाठी मला ‘शुगर बेबी’ बनण्यास कोणतीही अडचण नाही. ही एक आर्थिक तडजोड असल्याचेही ती म्हणाली.

कुठे झाला लिलाव?

लॉराच्या कौमार्याचा लिलाव एका प्रसिद्ध एक्सॉर्ट एजन्सीच्या वेबसाईटवर झाला. या लिलावमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणातील नामवंत नेते, सेलिब्रिटी सहभागी झाले होते. लॉराचे कौमार्य खरेदी करण्यासाठी या लोकांनी कोट्यवधींची बोली लावली. अखेर एका हॉलीवूड अभिनेत्यांनी सर्वाधिक किंमत मोजत तिचे कौमार्य विकत घेतले. लॉराने या अभिनेत्यासोबत करारही केला असून कौमार्याची पुष्टी करण्यासाठी तिने वैद्यकीय चाचणीही केली आहे.