घाटकोपरकरांनो, पाणी उकळून प्या! महापालिका प्रशासनाचे आवाहन

घाटकोपर भटवाडी परिसरातील जलाशयाच्या दोन नंबर कप्प्याची दुरुस्ती पूर्ण झाली असून यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना सुरुवातीचे काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन 17 ते 27 मार्चपर्यंत रहिवाशांनी पाणी उकळून, गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पंतनगर आऊटलेट भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रांच परिसर, वैतागवाडी, नित्यानंदनगर, धृवराजसिंह गल्ली मार्ग, सी.जी.एस. वसाहत, गंगावाडी, एम.टी.एन.एल. गल्ली, अंधेरी-घाटकोपर जोडमार्ग, लाल बहादूर शास्त्राr मार्ग,

सर्वोदय बुस्टिंगसॅनिटोरीयम गल्ली, एच.आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे.व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लाल बहादूर शास्त्राr मार्गालगतचा परिसर, घाटकोपर (पश्चिम), गांधीनगर.

नारायणनगर चिरागनगर, आझादनगर, गणेश मैदान, पारशीवाडी, नवीन माणिकलाल वसाहत, एन.एस.एस. मार्ग, महिंद्रा उद्यान (पार्क), डी.एस. मार्ग, खलई गाव, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम), हंसोटी गल्ली, खोत गल्ली, महात्मा गांधी मार्ग, नौरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे.व्ही.मार्ग, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गिगावाडी.