
महाराष्ट्र आणि गोवा फिरायला आलेल्या एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार झाला आहे. या महिलेची आणि आरोपीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. आरोपीला इंग्रजी बोलता येत नव्हतं. पण तो गुगल ट्रान्सलेटरच्या साह्याने तिच्याशी संवाद साधत होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार एक ब्रिटीश महिला हिंदुस्थानात महाराष्ट्र आणि गोवा फिरायली आली होती. तिची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिल्लीत राहणाऱ्या कैलाश या तरुणाची ओळख झाली होती. तिने कैलाशला फिरायला आमंत्रण दिलं होतं. पण आपल्याला प्रवास करता येणार नाही म्हणून दिल्लीत भेटू असे सांगितले. ही महिला दिल्लीच्या महिपालपूर हॉटेलमध्ये थांबली होती. तेव्हा कैलाश आपला मित्र वसीमसोबत या महिलेला भेटायला गेला. तिथे हॉटेलमध्येच कैलाशने या महिलेवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी महिलेने वसंत कुंज पोलीस स्थानकात कैलाशविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची माहिती दिल्लीतील ब्रिटीश दुतावासालाही दिली आहे. आरोपी कैलाश हा एका खासगी संस्थेत काम करतो. त्याला इंग्रजी बोलता येत नाही. गुगल ट्रान्सलेटरच्या साह्याने तो पीडीतेशी संवाद साधत होता अशी माहिती मिळाली आहे.