
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम करून नागरिकांना आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवता यावे यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे उपनगरात तब्बल 50 ओपन जिम उभारण्यात येणार आहेत. यापैकी दोन जिमचे काम पूर्ण झाले असून अन्य जिमच्या उभारणीसाठी म्हाडाकडून सार्वजनिक ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून पूर्व उपनगरात 25 तर पश्चिम उपनगरात 25 ओपन जिम उभारण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून वर्षभरात या जिम उभारण्यात येणार आहेत.