Benefits Of Deep Breathing- उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे दीर्घ श्वसन, वाचा दीर्घ श्वसनाचे फायदे

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात श्वसनाला खूप महत्त्व दिले आहे. श्वसन चालू असेल तोपर्यंत आपण जिवंत राहू.. पण श्वसनाचे महत्त्व केवळ इतक्यावरच थांबत नाही. तर श्वसनामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. श्वसनावरील नियंत्रण हाच मुख्यतः निरोगी आयुष्याचा पाया आहे. त्यात दीर्घ श्वसन हा एक उत्तम रामबाण इलाज मानला जातो.

दीर्घ श्वसनामुळे शांत झोप लागते तसेच दैनंदिन जीवनातला तणावही कमी होण्यास मदत होते. दीर्घ श्वसनाचे फायदे हे केवळ शारीरिक नाहीत, तर यामुळे मानसिक फायदेही खूप होतात. चला तर जाणून घेऊया दीर्घ श्वसनाचे शारीरिक आणि मानसिक फायदे.

दीर्घ श्वसनाचे फायदे

 

दीर्घ श्वसनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातील तणाव कमी होण्यास मदत होते.

मेंदूवरील ताण हा दीर्घ श्वसनामुळे कमी होतो तसेच स्नायूंवरील ताणही नाहीसा होतो.

दीर्घ श्वसनाचा फायदा आपल्या पचनसंस्थेला होतो, यामुळेच पाचनतंत्र सुधारते.

 

मधुमेहींसाठी दीर्घ श्वसन हे खूप हितावह मानले जाते. दीर्घ श्वसनामुळे रक्तातील साखरेची प्रमाण नियंत्रणात राहते आणि शरीरातील इन्सुलिन संतुलित होते.

 

दीर्घ श्वसनामुळे शरीरात उर्जेचा वावर सर्वाधिक वाढतो. दीर्घ श्वसनावेळी शरीर सर्वाधिक आॅक्सिजन वापरत असते.

उत्तम झोप लागण्यासाठी दीर्घ श्वसन हे कायम हिताचे आहे असे म्हटले जाते. दीर्घ श्वसनामुळे मन आणि मेंदू रिलॅक्स होण्यास मदत मिळते.

 

शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी दीर्घ श्वसन हा हमखास रामबाण उपाय मानला जातो.

 

दीर्घ श्वसनामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते. हद्यासाठी सुद्धा दीर्घ श्वसन हे खूप लाभदायक मानले गेलेले आहे.

 

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)