
दुबईहून गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल 14 किलो सोन्याची तस्करी करण्यात आली होती. या आरोपाखाली बेंगळुरू विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या रावला अलीकडेच अटक करण्यात आली होती. त्यामुळेच वेगवेगळ्या देशांमध्ये या सोन्याच्या किमतीमध्ये असलेला फरक आपल्याला लक्षात येतो. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दुबई हे कायम वरच्या नंबरवर राहिले आहे. परंतु असे असले तरी स्वस्त सोने मिळणाऱ्या देशांमध्ये दुबई हे सहाव्या क्रमांकावर आहे.
सोने स्वस्त असलेले देश
अमेरिका:- 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,586 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,874 रुपये आहे.
ऑस्ट्रेलिया: 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,602 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,889 रुपयांना उपलब्ध आहे.
सिंगापूर: 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,667 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,949 रुपये आहे.
स्वित्झर्लंड: 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,682 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,963 रुपये आहे.
इंडोनेशिया: 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,704 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,983 रुपये आहे.
स्वस्त सोन्याच्या किमती असलेल्या देशांमध्ये दुबई सहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यापर्यंत, दुबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,718 रुपये होती तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,996 रुपये होती.
परदेशातून परतणाऱ्या भारतीय नागरिकांना काही प्रमाणात सोन्याचे दागिने शुल्कमुक्त आणण्याची परवानगी आहे. पुरुष प्रवासी 50 हजार रुपयांपर्यंतचे सोन्याचे दागिने आणू शकतात. तर महिला प्रवासी 1 लाख रुपयांपर्यंतचे सोन्याचे दागिने आणू शकतात.