Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी खरेदी केली Tesla Car; म्हणाले मस्ककडून डिस्काउंट नाही घेतला

Donald Trump Buys Tesla Elon Musk Helps Him Pick

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( US President Donald Trump ) आणि Tesla कंपनीचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांची चांगलीच दोस्ती आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्या दोस्तीची जगभरात चर्चा असून अनेकांनी त्यावर टीका देखील केली आहे. आता अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एलोन मस्क यांच्यासोबत लाल रंगाची चकचकीत टेस्ला कार खरेदी केली. ही कार निवडण्यासाठी खुद्द एलोन मस्क यांनी ट्रम्प यांना मदत केली. एलोन मस्कची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला पाठिंबा देण्यासाठी ही कार खरेदी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

Tesla Model X च्या ड्रायव्हरच्या सीटवर बसताना ट्रम्प म्हणाले, ‘वाह, काय सुंदर आहे’. त्यानंतर त्यांच्या सोबतच्या सीटवर बसलेल्या मस्क बसले. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार अवघ्या काही सेकंदात ताशी 95 किलोमीटर वेग घेते.

ट्रम्प यांना गाडी चालवण्याची परवानगी नसल्याने त्यांनी कारची टेस्ट ड्राइव्ह घेतली नाही. पण ते म्हणाले की ही गाडी व्हाईट हाऊसमध्येच ठेवण्यात येईल जेणेकरून त्यांचे कर्मचारी ती वापरू शकतील.

ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सुमारे $80,000 किमतीत ही कार खरेदी केली आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारे डिस्काउंट मागितलेला नाही.

‘मस्क मला डिस्काउंट देईल, पण जर मी डिस्काउंट घेतला तर ते म्हणतील, अरे, मला फायदे मिळाले’, असं ट्रम्प यांनी बोलून दाखवलं.

मस्कवर कौतुकाचा वर्षाव

ट्रम्प यांनी टेस्ला खरेदी करण्याची दोन प्रमुख कारणे सांगितली – एक, ती एक उत्तम गाडी आहे आणि दुसरे म्हणजे, ‘एलोन मस्कने हे करण्यासाठी आपली शक्ती आणि आपले जीवन समर्पित केलं आहे आणि मला वाटतं की त्याला खूप अन्यायकारक वागणूक मिळाली आहे’.

‘जेव्हा मी काय घडत आहे ते पाहिलं, तेव्हा मी म्हणालो की मला टेस्ला खरेदी करायची आहे, आणि आम्ही फक्त समोर गेलो. त्याच्याकडे चार सुंदर कार होत्या आणि मी एक प्रेससमोरच खरेदी केली. ही खरेदी सर्वांसमोर करण्यात आली आहे. या कार सुंदर आहेत आणि उत्तम काम करतात’, असं ट्रम्प म्हणाले.

मस्क यांना ‘देशभक्त’ संबोधून ट्रम्प म्हणाले, ‘त्याने उत्तम काम केले आहे…असं नाही की ते रिपब्लिकन आहेत…कधीकधी, मला त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत ते नक्की कोणत्या विचारधारेचे आहेत हे देखील माहित नसतं, परंतु ते एक उत्तम माणूस आहेत’.

अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेनं वाटचाल? विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठा तोटा होण्याच्या अंदाजाने बाजारात चिंता

ट्रम्प प्रशासनाच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) मध्ये मस्कच्या भूमिकेपासून टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अलिकडेच, सरकारी खर्च कमी करण्याच्या त्यांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी अमेरिकेतील टेस्ला स्टोअर्सबाहेर DOGE विरोधी निदर्शक जमले होते, अनेकांनी ‘Elon must go away’ आणि ‘एलोन मस्कला काढून टाकण्यासाठी हॉर्न वाजवा’ असं लिहिलेले बॅनर धरले होते. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.