जागतिक पातळीवर तापमानवाढीचा फटका; शहरांना पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागणार ‘वॉटरएड’ संस्थेतील अभ्यासकांचा इशारा

सध्याच्या घडीला जगामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील तापमानात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. केवळ इतकेच नाही तर, दुष्काळ तसेच पूरसदृश्य परिस्थितीचा सामना अनेक देश सध्याच्या घडीला करत आहेत. जगातील वाढत्या तापमानामुळे जागतिक जलचक्रावर भीषण परिणाम होत असल्याचे, ‘वॉटरएड’ या संस्थेने केलेल्या एका अभ्यासांती दिसून आले आहे.

सध्याच्या घडीला जगातील दक्षिण आणि आग्नेय आशिया सर्वात जास्त ओल्या दुष्काळाचा सामना करत आहेत. युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका दिवसागणिक अधिकाधिक कोरडे भाग होत चालले आहेत. असे जगातील 100 पेक्षा अधिक शहरांमधून काढलेल्या 42 वर्षांच्या हवामान अभ्यासाअंती संशोधकांना आढळून आले आहे.

जागतिक पटलावर हवामान बदलासंदर्भात अधिक बोलताना, कार्डिफ विद्यापीठातील जल संशोधन संस्थेचे मायकेल सिंगर म्हणाले, जागतिक पटलावर तापमान बदल खूप आधीपासून घडत आहे. चीनच्या पूर्वेकडील शहर हांगझोउ आणि इंडोनेशियाची राजधानी जकार्ता ही दीर्घकाळापर्यंत पूर आणि दुष्काळाने ग्रस्त असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे हे अभ्यासातून दिसून आले आहे.

शांघायचे व्यावसायिक केंद्र असलेल्या टेक्सास शहर डलास आणि इराकची राजधानी बगदाद यांचा तीव्र पूर आणि दुष्काळाचा धोका वाढण्यामध्ये अग्रेसर आहेत. सर्वेक्षण केलेल्या शहरांपैकी 15 टक्के शहरांना एकाच वेळेला पूर आणि दुष्काळाचे धोके मोठ्या प्रमाणात वाढत होते.

यासंदर्भात बोलताना, सिंगर पुढे म्हणाले. तुम्ही कोण आहात, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब किंवा तुमच्याकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत की नाहीत याची पर्वा नाही. चीनच्या किनारपट्टीवरील शहर हांग्झोने गतवर्षी 60 दिवसांपेक्षा जास्त काळ अत्युच्च तापमानाचा विक्रम प्रस्थापित केला आणि त्यालाही भीषण पुराचा तडाखा बसला ज्यामुळे हजारो लोकांना स्थलांतरही करावे लागले होते.

जगातील ज्या शहरांनी पाण्याचा तुटवडा कमी करण्यासाठी किंवा पुरामुळे होणारे, नुकसान कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या होत्या. त्या शहरांना आता पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल, असा इशाराही सिंगर यांनी यावेळी दिला.