गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी

सिग्नलवर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. गौरव याच्या कारमध्ये अमली पदार्थाचे अंश सापडतात का? याबाबत तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. गौरवची कार जप्त केली आहे. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. सुरेंद्र आपुणे यांनी बाजू मांडली