
अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत इन-कॅमेरा चौकशी करण्यात येईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेत दिले. महामार्गाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. भास्कर जाधव यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती.