म्यानमारमधून 283 हिंदुस्थानींची सुटका

नोकरीच्या आमिषाला बळी पडून म्यानमारला गेलेल्या तब्बल 283 हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करण्यात आली असून त्यांना मायदेशात आणण्यात आले आहे. सोमवारी म्यानमार आणि थायलंडमधील हिंदुस्थानच्या दूतावासाने पीडितांना परत आणण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांशी समन्वय साधला, असे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. पीडितांची फसवणूक करून नंतर सायबर गुह्यात सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जायचा. त्यांना म्यानमार-थायलंड सीमेजवळील प्रदेशात कार्यरत असलेल्या घोटाळ्याच्या केंद्रांमध्ये जबरदस्तीने काम करण्यास सांगितले जात होते.