अमेरिकेकडून पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी

अमेरिकेने व्हिसाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानातील उच्चाधिकारी के. के. एहसान वॅगन यांना देशात प्रवेश नाकारला आहे. अलीकडेच एका अट्टल दहशतवाद्याला पकडून देण्यात मदत केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले होते. आता उच्चाधिकारी वॅगन यांच्या व्हिसामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचा दावा अमेरिकेने केला. ते अमेरिकेत सुट्ट्यांसाठी जात असताना लॉस एंजेलिस विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना अडवले आणि कागदपत्रांवर आक्षेप घेतला.