मणिपूरची जनता आजही पंतप्रधानांची वाट पाहत आहे! काँग्रेसचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सतत परदेशात जाण्यासाठी वेळ आहे, मात्र राष्ट्रपती राजवट असलेल्या मणिपूरला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून टीका केली. मणिपूरची जनता पंतप्रधानांची वाट पाहत आहे. मोदी जवळपास दोन वर्षांपासून मणिपूरला गेले नाहीत. हा त्या राज्यातील लोकांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.