
संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 11) संपन्न झाला. या पगडीची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अॅण्ड जिनिअसमध्ये नोंद झाली आहे.
तीर्थक्षेत्र देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट, श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांच्या उपस्थितीत दिलीप सोनिगरा यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अॅण्ड जिनिअस फाऊंडेशनचे सीईओ पवनकुमार सोलंकी यांनी विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र दिले. याप्रसंगी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचा संपूर्ण परिवार, मुकुंद राऊत महाराज, शंकर मराठे, रवींद्र ढोरे, नितीन काकडे उपस्थित होते.