Maharashtra Budget Session 2025 – धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

विरोधकांनी तगादा लावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हवालदिल झाले आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा त्यांना विधानसभेत करावी लागली. 4 मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा आपल्या पीएमार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला होता. त्याबाबत फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती. त्यावरून विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केली होती. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली पाहिजे, असा आग्रहही धरला होता. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत, असे विधानसभेत स्पष्ट केले.