Maharashtra Budget Session 2025 – अक्कलकोटच्या विकासासाठी 378.71 कोटी मंजूर

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये एकूण 9 रस्ते विकसित करण्याचे प्रस्तावित असून चार रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत. उर्वरित रस्त्यांच्या भूसंपादनासाठी व विकासकामांसाठी नगर परिषदेकडून सुधारित विकास आराखडा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने या विकास आराखड्यास 378.71 कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उत्तर देताना दिली.