Maharashtra Budget Session 2025 – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे राष्ट्रीय स्मारक उभारा!

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेंडगाव या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीत त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी दर्यापूर विधानसभेचे शिवसेना आमदार गजानन लवटे यांनी राज्य शासनाला केली. त्यासंदर्भात त्यांनी आज सामाजिक न्यायमंत्र्यांना लेखी निवेदन दिले. संत गाडगेबाबा आरोग्यालय, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण योजना व संत गाडगेबाबा फळ प्रक्रिया केंद्र, लघु उद्योग शेतकरी प्रशिक्षण केंद्र, निराधारांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबांचे जीवनपर संग्रहालय व उद्यानही त्या स्मारकात असावे असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.