
रस्त्यालगत, पुलांखाली उभ्या असलेल्या बेवारस आणि धोकादायक ठरणाऱ्या वाहनांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून आज माटुंग्यामध्ये 54 वाहने नष्ट करून 154 जणांना नोटीसही बजावण्यात आली. बेवारस वाहने जमा करून ती नष्ट करण्याची मोहीम पालिकेने आता हाती घेतली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी बेवारस वाहनांमुळे नागरिकांना धोका निर्माण होतो. या ठिकाणी गैरप्रकारही चालत असल्याचे समोर आले आहे. शिवाय बेवारस वाहनांचा वापर काही समाजपंटकांकडून केला जात असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर उप आयुक्त (परिमंडळ-2) प्रशांत सपकाळे, एफ/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात माटुंगा परिसरातील विविध रस्त्यांवर पडलेली निकामी व बेवारस वाहने निष्कासित करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली.