म्यानमारमधील 283 हिंदुस्थानींची अखेर सुटका

म्यानमारमध्ये अडकलेल्या 283 हिंदुस्थानी नागरिकांची अखेर सुटका करण्यात आली. या सर्व नागरिकांना बनावट नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात होते. म्यानमार आणि थायलंडमधील भारतीय दूतावासाने स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या सर्व नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे.

या लोकांना म्यानमार-थायलंड सीमेवरील भागात कार्यरत असलेल्या घोटाळ्याच्या पेंद्रांमध्ये सायबर गुन्हे आणि इतर फसव्या कारवायांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले गेले होते. भारतीय हवाई दलाच्या विमानाने 283 हिंदुस्थानी नागरिकांना परत आणले जाणार आहे.