एअर इंडिया विमानाचे टॉयलेट तुंबले

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमान सेवेवर सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. विमानात तुटलेली खुर्ची मिळाल्यानंतर एका वृद्ध महिलेला व्हिलचेअर नाकारल्याची दुर्दैवी घटनाही समोर आली आहे. परंतु आता एअर इंडियाच्या एका विमानात चक्क टॉयलेट तुंबल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या तुंबलेल्या टॉयलेटमध्ये चिंध्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्या आहेत. हे विमान शिकागोवरून ग्रीनलँडला जात होते. परंतु टॉयलेट तुंबल्यामुळे हे विमान शिकागोला उतरवण्यात आले आहे. पाच तासांच्या प्रवासानंतर हे विमान पुन्हा शिकागोला वळवण्यात आले. विमान प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा अनेक प्रवाशांना फटका बसला. एअर इंडियाचे बोइंग 777 या विमानात एकूण 300 प्रवासी होते. विमानात असलेले सर्व  टॉयलेट तुंबल्याने विमान प्रशासनाने विमान वळवण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या विमानातील टॉयलेटच्या ड्रेनेज लाइनमधून चक्क चिंध्या, कापडाचे मोठे तुकडे, प्लॅस्टिकच्या पिशव्या बाहेर काढण्यात आल्या.