
होळी सणानिमित्त इंडिगो, अकासा एअर आणि स्टार एअर या एअरलाईन्स पंपन्यांनी आपल्या प्रवाशांसाठी खास डिस्काऊंट ऑफर आणली आहे. या विमान पंपन्यांनी फ्लाईट बुकिंगवर जबरदस्त सवलत जारी केलीय. त्यामुळे स्वस्तात मस्त असा देशांतर्गत प्रवास करता येणार आहे. खास करून होळीच्या काळात प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
खास प्रोमो कोड
अकासा एअरलाईन्सने देशांतर्गत उड्डाणात प्रवास भाडे 1499 रुपयांपासून केल्याची घोषणा केली आहे. अकासा एअरलाईन्सने ‘होली15’ हा खास प्रोमो कोड जारी केला आहे. प्रोमो कोडचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात 15 टक्क्यांची सवलत मिळू शकते. यामध्ये सीट निवडीवर 15 टक्के सवलतदेखील आहे. हा खास होली सेल 10 ते 13 मार्च दरम्यानच्या बुकिंगवर असेल आणि त्यावर 17 मार्च 2025पासून प्रवास सुरू करता येईल.
स्वस्त आणि मस्त प्रवास
इंडिगोने होळी गेटवे सेल सुरू केला आहे. ज्यामध्ये देशांतर्गत प्रवास अवघ्या 1999 रुपयांत प्रवास करता येईल. 17 मार्च ते 21 सप्टेंबरदरम्यानच्या प्रवासासाठी 10 ते 12 मार्चदरम्यान बुकिंग करता येईल.
फेस्टिव फेयर स्किम
स्टार एअरने फेस्टिव फेयर स्किम सुरू केली असून त्याअंतर्गत इकॉनॉमी क्लासचा प्रवास 999 रुपयांपासून सुरू होत आहे, तर बिझनेस क्लासचा प्रवास 3999 रुपयांपासून सुरू होईल. ही खास बुकिंग 11 ते 17 मार्च 2025 दरम्यान करता येईल. या ऑफरवर 11 मार्च ते 30 सप्टेंबरदरम्यान प्रवास करता येईल.