
दिल्लीआणि देशातील इतर शाळेत बॉम्ब ठेवल्याचे ईमेल आणि फोन येण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता आशीच घटना पुण्यातही घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने प्रशासन आणि पोलीस अल्रट मोडवर आले होते. महाविद्यालायत ईमेलद्वारे आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या ई-मेलची तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह बॉम्बस्कॉड, श्वानपथकानेही महाविद्यालयाची कसून पाहणी केली. अखेर तपासणीनंतर कुणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचं लक्षात आले. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटेकचा निश्वास सोडला.
महाविद्यालयात सध्या परीक्षा सुरू असल्याने परिसर गजबजेला असतो. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती असते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी या ई-मेलची तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह बॉम्बस्कॉड आणि श्वासपथकही होते. त्यांनी डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये सर्वत्र तपासणी केली. तसेच बॉम्बशोधक आणि बॉम्ब निकामी करणारे पथकही अलर्ट मोडवर होते. अखेर ही अफवा ठरल्याचे सिद्ध झाले.
बॉम्ब असल्याचा ईमेल आल्यानंतर सुरक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आले. पोलीस, श्वनपथक आणि बॉम्बशोधक पथक तातडीनं महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी महाविद्यालयात तपासणी व शोधमोहिम सुरू केली. या शोधकार्यात संपूर्ण महाविद्यालय परिसरात कुठेही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही. त्यामुळे अज्ञाताने हा खोडसाळपणा केल्याचं स्पष्ट झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्या या अज्ञाताचा शोध सुरु आहे.