पुण्यात 35 कोटींच्या 100 शववाहिन्या धुळखात पडून, तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना झाला होता व्यवहार

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य खातं होतं. तेव्हा तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्याने 35 कोटी रुपयांच्या 100 शववाहिन्या विकत घेतल्या होत्या. पण ही वाहनं सध्या धुळखात पडली आहेत.

एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. त्यांनी राज्यात शववाहनं हवीत असे पत्र दिले होते. संपूर्ण कंत्राट हे 350 कोटी रुपयांचं होतं. त्यापैकी केंद्र सरकारने 35 कोटी रुपये मंजूर केले. राज्य सरकारने आयशर कंपनीकडे या शववाहिन्यांचे कंत्राट देण्यात आले. आयशर कंपनीने या 100 गाड्या तयार केल्या आणि राज्य सरकारकडे सुपुर्द केल्या. या 100 शववाहनं सध्या पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या जवळ धुळखात पडल्या आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात टप्प्या टप्याने या गाड्या राज्य सरकारकडे आल्या पण त्यांचे वितरण अद्याप झालेले नाही. या गाड्या जरी नवीन असल्या तरी अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले आहेत. NDTV मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. या 35 कोटी रुपयांच्या खरेदीत मोठा घोटाळा दडलेला आहे का अशी शंका वृत्तवाहिनीने व्यक्त केली आहे.