Flaxseed Oil Benefits- वजन कमी करण्यासाठी जवसाचे तेल आहे खूप उपयुक्त, जाणून घ्या जवसाच्या तेलाचे फायदे

भारतीय पाककृती त्याच्या विविधतेसाठी जगभरात ओळखली जाते. स्वयंपाकात आपण वापरत असलेले मसाले हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. जवसाचे तेल आपल्या आहारामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते. जवस चटणी ही पूर्वापार आपल्या आहारात समाविष्ट आहे. जवसाचा उपयोग चटणीसाठी करता येतो तर जवसाचे तेल हे विविध आजारांवर रामबाण औषध म्हणूनही ओळखले जाते. जवसाचे तेलापासून आपण अनेक रोगांपासून संरक्षण करू शकतो. तसेच हे तेल आपल्या शरीराचे पोषण करण्यासही खूप उपयुक्त आहे.

 

 

जवसाच्या तेलाचे फायदे

जवसाच्या तेलामध्ये जळजळ कमी करण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे दाहक-विरोधी गुणधर्माचा परिणाम संधिवात (सांधेदुखीची समस्या) आणि सांधेदुखीवर उत्तम होतो.

 

हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी जवसाचे तेल हे खूप प्रभावी मानले जाते. जवसाचे तेल सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. जवसाच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, ते हृदयासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

 

डोळ्यांसाठी जवस हे निसर्गाचे वरदान आहे. ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असल्याने ते डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाऊ शकते. डोळ्यांच्या कोरडेपणासारख्या समस्यांमध्ये फ्लॅक्ससीड तेलाचे फायदे खूप आहेत.

 

जवसाचे तेल हे रजोनिवृत्तीच्या काळात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जवस तेलामध्ये आढळणाऱ्या इस्ट्रोजेनिक प्रभावामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्यांचे निदान करण्यासाठी हे तेल उपयोगी मानले जाते.

(कोणतेही उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)