
दुबईत झालेल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा पराभव करत हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत हिंदुस्थानचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्या कामगिरीपेक्षा त्याने घातलेल्या घड्याळांचीच चर्चा सुरू आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत हार्दिक पंड्याने तब्बल 6 ते 7 कोटी रुपयांचे घड्याळ घातले होते, तर अंतिम लढतीत त्याच्या हातामध्ये हिंदुस्थानला विजेतेपदाबद्दल मिळालेल्या बक्षिसाहून अधिक किंमतीचे घड्याळ होते.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल हिंदुस्थानला जवळपास 23 लाख डॉलर्सचे (20 कोटी रुपये) बक्षिस मिळाले. पण फायनलमध्ये हार्दिक पंड्याने घातलेल्या घड्याळाची किंमत 18 ते 21 कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. इंडियन होरोलॉजीच्या हवाल्याने ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.
अफवा पसरवू नका! जाडेजाने एकाच वाक्यात निवृत्तीचा विषय संपविला
हार्दिक पंड्याने फायनलमध्ये रिचर्ड मिले ब्रँडचे आरएम 27-04 मॉडेलचे घड्याळ घातले होते. याची बाजारात किंमत जवळपास 18 ते 21 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. कंपनीने अशी फक्त 50 घड्याळे बनवली आहेत आणि जगातील काही खास खेळाडूंकडे ही घड्याळे आहेत. या घड्याळाचे वजन अवघे 30 ग्रॅम असून यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.
यंदा ना विजययात्रा, ना जल्लोष; बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या खेळाडूंकडे वेळच नाही