
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज मोठा गाजावाजा करत आपला पहिलावहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, बेरोजगार युवा पिढी, नोकरदार मंडळींना त्यातून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती निरर्थक ठरली. 45 हजार कोटी रुपये तुटीचा हा अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या घोषणांना नवा कढ काढून समोर वाढलेला फोडणीचा भातच ठरला. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेचे रस्ते लागले आहेत. सरकारने महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलले आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना टोपी लावली तर कंत्राटदारांना मात्र खोकी दिली आहेत. अर्थसंकल्पातील जमा-खर्चाचे गणित पाहिले तर प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82 हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे तर संभाजीराजांचे संगमेश्वरात भव्य स्मारक उभारणार
- मुघलांच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज जिथून निसटले त्या जागी आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार.
- संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाड्याच्या जागी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 220 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली.
- 3 ऑक्टोबर ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’
- लाडक्या बहिणींना फडणवीसांचा डिसेंबरचा वादा
- ईव्ही कार, सीएनजी, घरे महागणार