
उत्तर इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात तेलवाहू जहाज आणि मालवाहू जहाजामध्ये जोरदार टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर दोन्ही जहाजांना भीषण आग लागली. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा वाढण्याची शक्यता आहे. ब्रिटिश आपत्कालीन सेवेकडून बचाव मोहीम सुरू आहे. काही क्रू मेंबर्स अद्याप बेपत्ता आहेत.
भारतीय वेळेनुसार दुपारी 3.18 वाजता लंडनपासून 250 किमी दूर हल किनाऱ्याजवळ ही दुर्घटना घडली. अमेरिकेचे तेल उत्पादन वाहक जहाज एमव्ही स्टेना इमॅक्युलेट नांगरलेले होते. तर सोलोंग हे मालवाहू जहाज स्कॉटलंडच्या ग्रेंजमाऊथहून नेदरलँडच्या रॉटरडॅमला चालले होते. यादरम्यान ही टक्कर झाली.
बचाव मोहिमेसाठी अनेक लाईफबोट्स, एक तटरक्षक दलाचे बचाव हेलिकॉप्टर, एक तटरक्षक दलाचे विमान आणि अग्निशमन क्षमता असलेली जवळची जहाजे पाठवण्यात आली असल्याचे ब्रिटनच्या सागरी आणि तटरक्षक दलाच्या एजन्सीने सांगितले.