
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर आज ईडीने छापा टाका. छापा टाकल्यानंतर बघेल यांच्या घरातून बाहेर निघताच संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी पथकावर आपला राग काढला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी ईडीचे अधिकारी 4 वाहनांमधून भूपेश बघेल यांच्या भिलाई येथील घरी पोहोचले. कारवाईदरम्यान, नोटा मोजण्यासाठी मशीन देखील आणण्यात आल्या होत्या. यानंतर बघेल यांच्या घरातून बाहेर आल्यावर काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. दरम्यान, छत्तीसगड दारू घोटाळा प्रकरणात ईडीने भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला समन्स बजावले आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.