
आपल्याकडे योगशास्त्र आणि योग संस्कृती खूप प्राचीन आहे. काहीशे वर्षांपूर्वींची ही साधना आज पाश्चात्यांनीही आजमवलेली आहे. योग म्हणजे शरीर आणि मनाचे संतुलन. योग शब्द संस्कृत भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. योगाचे असे अनेक प्रकार आणि आसन आहेत जे आपले शरीर आणि मनच नव्हे तर आपला आत्मा देखील शुद्ध करतात. योगाचे बरेच भाग आहेत आणि त्यापैकी प्राणायाम देखील योगाचा एक भाग आहे.
प्राणायाम श्वास आणि चेतना यांचे संतुलन किंवा संयोजन असे म्हटले जाऊ शकते. प्राणायामाच्या प्रकारातील कपालभाती प्राणायामाचे फायदे आपण बघुया.
कपालभाती म्हणजे काय?
कपालभाती हे दोन वेगळ्या शब्दांनी बनले आहेत, कपाल आणि भाती. कपाळ म्हणजे डोके किंवा कपाळ आणि भाती म्हणजे तेज किंवा चमक. अशा प्रकारे कपालभाती म्हणजे कपाळावरील तेज ते चांगले आरोग्याचे लक्षण आहे. दुसरा अर्थ असा आहे की मनाला आंतरीक शुद्ध करणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे आणि बुद्धीची चमक वाढवणे म्हणजे कपालभाती. कपालभाती हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. हा एक श्वास प्राणायाम आहे.
कपालभाती केल्याने पोटासह शरीराच्या सर्व अवयवांना सामर्थ्य प्राप्त होते. हा प्राणायाम करताना पोटावर, आपल्याला शक्य तितका ताण द्यावा लागेल.
कपालभातीचे फायदे
कपालभाती प्राणायामामुळे आपल्या शरीरातील चयापचय योग्य राहते, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. तसेच आपल्या शरीराची अधिक उर्जावान होते. पोटावरील निरुपयोगी चरबी काढून टाकण्यास हा अतिशय उपयुक्त प्राणायाम आहे.
कपालभाती प्राणायाम केल्याने आपली श्वसन प्रणाली बळकट होते. शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो. ज्यामुळे अवयवांची कार्यक्षमता देखील वाढते. कपालभाती प्राणायाम केल्याने शरीर निरोगी राहते आणि बुद्धीची शक्ती वाढते.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)