Vitamin D Food- व्हिटॅमिन डी साठी या पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे!

व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी खूप आवश्यक घटक मानला जातो. व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करतो त्याच जोडीला रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डी हे खूप गरजेचे मानले जाते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांच्या आजारांना सुरुवात होते. म्हणूनच व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करणे हे खूप गरजेचे आहे.

 

 

व्हिटॅमिन डी आपण कशामधुन मिळवु शकतो?

सर्वात महत्त्वाचा स्त्रोत्र म्हणजे सकाळची कोवळी सुर्याची किरणे यामधुन आपल्याला योग्य त्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळवता येऊ शकते.

 

आहारात मशरूमचा समावेश करावा. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. तसेच मशरूम हा पचण्यासही उत्तम आहे.

 

पनीरमध्येही व्हिटॅमिन डी चे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आहारात किमान आठवड्यातून एकदा पनीरचा समावेश करावा.

 

सोया मिल्क मध्येही व्हिटॅमिन डीची मात्रा अधिक आहे. सोया मिल्क कोणत्याही जनरल स्टोर्समध्ये सहज उपलब्ध असते. सकाळी साधारण अर्धा ग्लास सोया मिल्क पिण्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळु शकते. सोयामिल्कमध्ये आयर्न प्रोटीन याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरासाठी हे दोन्ही घटक खूपच उपयुक्त आहेत.

 

मासे हे व्हिटॅमिन डीचा चांगला स्त्रोत मानले जातात. त्यामुळेच आहारात मासे समाविष्ट करणे हे खूप गरजेचे आहे.

 

अंड्यातील पिवळा बलक हा कॅल्शियम व्यतिरिक्त उत्तम व्हिटॅमिन डी पुरवणारा स्त्रोत मानला जातो. त्यामुळे डाॅक्टरांकडूनही उकडलेली अंडी दिवसातून किमान दोन खाण्याचा सल्ला दिला जातो.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होऊ शकते?

थकवा येणे, धाप लागणे, ताप येणे, हाडांच्या वेदना होणे, मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. तसेच हद्याचे ठोके वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)