Summer Face Mask- उन्हाच्या लाहीवर घरी करा रामबाण उपाय, घरगुती फ्रुट मास्क लावा गारेगार व्हा!

उन्हामुळे त्वचा काळवंडते आणि चेहऱ्याच्या त्वचेवर काळे डागही पडतात. त्यामुळेच त्वचेची लाही लाही होते. अशावेळी चेहरा मलूल पडतो तसेच निस्तेज दिसायला लागतो. अनेकदा सनस्किन लोशन उपयोगी पडत नाही. उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घ्यायची तरी कशी अशा प्रश्न पडतो. तर यावर प्रभावी उपाय म्हणजे फळांपासून बनवलेले मास्क आपण उन्हाळ्यावर उतारा म्हणून बनवू शकतो. घरच्या घरी आपण हे मास्क अगदी साध्या पद्धतीने बनवू शकतो.

 

 

 

घरगुती फ्रूट मास्क कसे तयार कराल?

 

खरबूज मास्क

खरबूजचा मास्क बनविण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला त्यातील बिया काढाव्या लागतील आणि टरबूज स्मॅश करावं लागेल.

 

त्यानंतर स्मॅश केलेल्या खरबुजात लिंबाचा रस टाका.

 

कापसाच्या मदतीनं आपल्या चेहऱ्यावर आणि हाता-पायांवर हा मास्क लावून ठेवावा.

 

हा मास्क वाळेल, त्यानंतर त्यावर दुसरा आणि मग तसाच तिसरा कोट लावावा.

 

अखेर कॉटन फळाच्या ज्यूसमध्ये बुडवून आपल्या डोळ्यांवर ठेवावा आणि आराम करावा.

 

मास्क पूर्णपणे वाळल्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवून टाकावा.

 

 

संत्र्याचा मास्क

संत्र्याचा मास्क तयार करण्यासाठी आपण संत्र्याचा ज्यूस कुठल्याही फेस पॅकमध्ये मिक्स करावा आणि चेहऱ्यावर लावावा.

 

मास्क वाळेल तेव्हा साध्या पाण्यानं चेहरा धुवून टाकावा.

 

आपल्याला हवं असल्यास संत्र्यानं चेहऱ्यावर मसाज करू शकता. असं केल्यानं आपल्याला जास्त फायदा मिळेल.

 

संत्र्याच्या गरानं चेहऱ्यावर मसाज करण्यापूर्वी ते फ्रीजमध्ये ठेवून थंड केल्यास उत्तम.

 

 

काकडीचा मास्क

काकडीच्या मास्कचा उन्हाळ्यात प्रत्येकानंच आवर्जून वापर करावा.

 

काकडीचा रस काढून तो वरचेवर आपल्या चेहऱ्यावर लावावा.

 

तुम्हाला हवं असल्यास त्यात लिंबाचा रसही मिसळू शकता. कारण त्याचा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून उपयोग होतो. या मास्कमुळं उन्हामुळे गेलेली चेहऱ्यावरील चमक परत येते.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)