
इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) चा संस्थापक ललित मोदी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. वानुआटू सरकारने ललित मोदी याला अलीकडेच जारी केलेला पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यार्पणापासून वाचण्याचे प्रयत्न करत असल्याचे कारण समोर येत असल्याचे लक्षात आल्याने त्याला वानुआटूचे नागरिकत्व देता येणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे.
आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली फरार असलेला हा अब्जाधीश हिंदुस्थानला हवा आहे. यापूर्वी ललित मोदी यांने लंडनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयात त्याचा हिंदुस्थानी पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.