काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा पक्षाला राम राम

काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडला आहे. धंगेकर मिंधे गटात सामील होणार अशी घोषणा केली आहे. रवींद्र धंगेकर 2023 च्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जिंकले होते. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर धंगेकर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढले. पण दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वी धंगेकर पक्ष सोडतील असा अंदाज व्यक्त केला होता. आता मिंधे गटात प्रवेश घेण्याचे धंगेकरांनी जाहीर केले आहे.