
गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी मार्गावरील रत्नागिरी हॉटेलजवळील दुकाने आणि झोपड्यांना संध्याकाळी सवासातच्या सुमाराला आग लागली. वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने पसरल्यामुळे यात अग्निशमन दलाने आगीला लेव्हल दोनची आग घोषित केले. दलाच्या जवानांनी सलग दीड तास अथक मेहनत करून ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. काही दिवसांपूर्वी फिल्मसिटी जवळच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत सुमारे 150 ते 300 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.