चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, पाककडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन

हिंदुस्थानचे लष्कर कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, चीन, पाकिस्तानसह इतर आव्हानांबद्दल भाष्य केले. पाकिस्तान दहशतवाद रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचे लष्करप्रमुख म्हणाले. लष्कराच्या क्षमतेबद्दल बोलताना ते म्हणाले की, हिंदुस्थानचे लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. लष्कर ड्रोन टेक्नॉलॉजीसह नव्या लष्करी क्षमतांवर सातत्याने काम करत आहे. युद्ध कोणत्याही देशासाठी हिताचे नसते, पण गरज पडल्यास हिंदुस्थानचे लष्कर पूर्ण तयारीने शत्रूला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.