चलो, बॅग भरो और निकल पडो, मोदी पुन्हा जाणार दोन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर

फेब्रुवारी महिन्यात अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 11 आणि 12 मार्चला दोनदिवसीय मॉरिशस विदेश दौऱ्यावर जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. मॉरिशसमधील राष्ट्रीय दिवस समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी या दौऱ्याची अधिकृत माहिती शेअर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा मॉरिशसचा दुसरा दौरा आहे. याआधी त्यांनी 2015 मध्ये दौरा केला होता. पंतप्रधान मोदी हे कोरोना काळ वगळता दर महिना दोन महिन्यांनी जगाच्या कोणत्या तरी देशाचा दौरा करतात हे विदेश दौऱ्यांच्या यादींवरून दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात ते अमेरिकेला जाऊन आले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांनी सर्वात जास्त अमेरिका दौरे केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 2015 मध्ये सर्वात जास्त विदेश दौरे करत 28 देशांना भेटी दिल्या. यात श्रीलंका, मॉरिशस आणि सेशेल्स देशाचा दौरा केला.