
भायखळा कारागृहातील महिला कैद्यांचा आजचा दिवस आगळावेगळा ठरला. जागतिक महिला दिनाचा या कैदी महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. मनोरंजनात्मक कार्यक्रम, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, अपत्यांशी गळाभेट तसेच सर्वांसोबत एकत्र बसून अल्पोपाहार करण्याची पर्वणीच त्यांना मिळाली. दक्षिण विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक विकास रजनलवार यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप चव्हाण, तुरुंगाधिकारी अमृता दशवंत व अन्य अधिकारी, कर्मचाऱयांनी आजचा दिवस कैदी महिलांसोबत मोठय़ा उत्साहात साजरा केला.