
अधिवेशन झाल्यावर आपण शांत बसणार नाही. सर्वांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. शिंदे समिती काम करीत नाही. उपोषण सोडताना गुन्हे मागे घेऊ म्हणाले होते. मात्र गुन्हे काही मागे घेतलेले नाहीत. सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढावा. आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून कुणबी प्रमाणपत्र लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे -पाटील यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, काही गढूळ व्यक्तींना जातीयवादाचा नाद लागलाय. धर्म, देव आणि महापुरुषांपेक्षा काही लोकांना त्यांची जात मोठी वाटतेय. छगन भुजबळ यांच्या डोक्यात फक्त जातीभेद आहे. त्यांना धनगर, ओबीसी आणि मराठय़ांमध्ये भांडणे लावायची आहेत. मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असेही ते म्हणाले.