
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत असताना दुसरीकडे स्वारगेट सारख्या मध्यवर्ती बसस्थानकात तरुणीलवर बलात्काराची घटना घडली होती. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच शनिवारी सकाळी एक व्हिडीओ व्हायरल असून यात श्रीमंत बापाची बेवडी पोरं रस्त्याच्या मधोमध बीएमडल्ब्यू कार उभी करून अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलीस कारसह या तरुणांचा शोध घेत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, एक बीएमडब्ल्यू कारच चालक तरुण येरवाडा भागातील शास्त्री चौकात असणाऱ्या ट्राफिक सिग्नलला रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवतो आणि दुभाजकावर लघवी करतो. एवढेच नाही तर पुणेकर त्याला जाब विचारायला गेल्यावर तो पँटची चैन उघडतो आणि अश्लील चाळे करतो. त्यानंतर वेगाने गाडी दामटवतो आणि फरार होतो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
पुण्यात श्रीमंत बापाच्या बेवड्या पोरांनी BMW कार रस्त्याच्या मधोमध उभी केली, सिग्नललाच लघुशंका करत अश्लील चाळे केले pic.twitter.com/SYmXMyFM3F
— Saamana Online (@SaamanaOnline) March 8, 2025