साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 09 मार्च 2025 ते शनिवार 15 मार्च 2025

>> नीलिमा प्रधान

मेष -महत्त्वाची कामे होतील

मेषेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. कठीण कामे सप्ताहाच्या पूर्वार्धात करण्याचा प्रयत्न करा. गोड बोलून मनातील गुपित काढून घेण्याचा प्रयत्न होईल. नोकरीतील महत्त्वाची कामे होतील. खरेदी-विक्रीत सावध रहा. धंद्यात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. मनावर दडपण येईल. शुभ दि. 9, 12

वृषभ – वेळेला महत्त्व द्या

वृषभेच्या एकादशात सूर्य, बुध, शुक्र युती. मनाप्रमाणे काम करता येईल. वेळेला महत्त्व द्या. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक घटना घडेल. प्रगती होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कलाटणी देणारा प्रसंग घडेल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. पद, प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. शुभ दि. 9, 10

मिथुन – प्रकृतीत सुधारणा होईल

मिथुनेच्या दशमेषात सूर्य, बुध शुक्र युती. प्रत्येक दिवस उत्साहाचा, आत्मविश्वासाचा आहे. यश खेचता येईल. अडचणीत आलेली कामे करून घ्या. नोकरीतील समस्या सोडवाल. प्रकृतीत सुधारणा होईल. धंद्यातील गैरसमज, तणाव कमी करू शकाल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. शुभ दि. 10, 11

कर्क – यश मिळवता येईल

कर्केच्या भाग्येषात सूर्य, बुध शुक्र युती. राग व अहंकार याचा वापर करू नका. यश मिळवता येईल. जुना वाद मिटवण्याची संधी सोडू नका. नोकरीत हलगर्जीपणा नको. धंद्यात आळस, भांडण टाळा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या शेवटी दिशादर्शक कालावधी, मुद्दे विचारात घेतली जातील. शुभ दि. 12, 15

सिंह – उतावळेपणा नको

सिंहेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. शारीरिक, मानसिक संतुलन कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. गुप्त कारवाया वाढतील. क्षेत्र कोणतेही असो उतावळेपणा नको. नोकरीत महत्त्वाची कामे लवकर संपवा. धंद्यात नुकसान, वाद टाळा. मोह, व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कलाटणी देणारी घटना घडेल. संयम ठेवा. शुभ दि. 9, 12

कन्या – संयमाने कृती करा

कन्येच्या सप्तमेषात सूर्य, बुध शुक्र युती. सार्वजनिक क्षेत्रात संयमाने कृती करा. प्रतिष्ठा जपा. आरोप होतील. सप्ताहाच्या शेवटी दिलासा देणारी बातमी मिळेल. विरोधक तहाची भाषा करतील. नोकरीत व्याप राहील. नवे मित्र मिळतील. धंद्यात नम्रता ठेवा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही मत व्यक्त करण्याची घाई नको. शुभ दि. 9, 15

तूळ – गैरसमज होतील

तूळेच्या षष्ठेशात सूर्य, बुध शुक्र युती. प्रकृतीची योग्य काळजी घ्या. नात्यात, मैत्रीत मनस्ताप होईल. गैरसमज होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. मौल्यवान वस्तू सांभाळा. धंद्यात फसगत टाळा. भावनेच्या आहारी न जाता राजकीय, सामाजिक क्षेत्रात मत मांडण्याची घाई नको. व्यवहारात अडकू नका. शुभ दि. 9, 10

वृश्चिक – मित्रांचे सहकार्य मिळेल

वृश्चिकेच्या पंचमेषात सूर्य, बुध शुक्र युती. अनेक कामातील अडचणी कमी होण्यास सुरूवात होईल. आळसात वेळ घालवू नका. नोकरीत प्रभावीपणे काम कराल. मित्रांना मदत कराल. तुम्हाला त्यांचे सहकार्य मिळेल. धंद्यात नवा विचार कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठोस निर्णय घेताना विचार करावा लागेल. विरोधक वेगळी भाषा करतील. शुभ दि. 13, 15

धनु – प्रकृतीला जपा

धनुच्या चतुर्थात सूर्य, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे करताना तारेवरची कसरत करावी लागेल. क्षुल्लक अडचणी येतील. प्रकृतीची हेळसांड करू नका. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्णय घेताना विचारांचा गुंता होईल. शुभ दि. 9, 12

मकर – प्रगतीची संधी लाभेल

मकरेच्या पराक्रमात सूर्य, बुध शुक्र युती. तुमचा उत्साह, आत्मविश्वास बळावला जाईल अशा घटना घडतील. ताणतणाव क्षुल्लक वाटतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. धंद्यातील गुंता सोडवण्याचा मार्ग दिसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा, मान वाढेल. स्वप्नपूर्ती होईल. कला, साहित्यात चांगले काम होईल. शुभ दि. 10, 11

कुंभ – ताण कमी होईल

कुंभेच्या धनेषात सूर्य राश्यांतर, सूर्य, शनि युती. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. मनावरील ताण कमी होईल. जुना व्यवहार नव्याने डोके वर काढण्याची शक्यता. नोकरीत सतर्क रहा. धंद्यात क्षुल्लक अडचण येईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कलाटणी देणारी घटना घडेल. नवा व्यवहार सावधपणे करा. शुभ दि. 9, 12

मीन – अहंकार दूर ठेवा

स्वराशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरू लाभयोग. उत्साहाच्या भरात कोणतीही चुकीची कृती करू नका. भावना व व्यवहार यांची गल्लत करू नका. वाद, अहंकार नको. तटस्थ रहा. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणत्याही प्रसंगाला बळी पडू नका. प्रतिष्ठा, मान जपा. गोड बोलण्यावर भाळू नका. धीर धरा. व्यसन, मोह नको. शुभ दि. 9, 15