
इचलकरंजी येथील एका व्यक्तीने पोलीस ठाण्यासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यक्तीच्या पत्नीने घटस्फोट न घेता दुसऱ्याशी लग्न केल्यामुळे तो चांगलाच संतापलेला होता.
संबंधित व्यक्ती पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी तो पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा ही घटना घडली.
आपल्या न्याय मिळावा अशी मागणी तो वारंवार करत होता. अखेर अस्वस्थ असलेल्या या व्यक्तीनं पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं.
स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तो व्यक्ती वाचला. तो 60 टक्के भाजला होता. सध्या उपचारासाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात त्याला दाखल आहे.