वरळीतील स्मशानभूमीची समस्या सोडवा – सुनील शिंदे

वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीच्या अनेक समस्या असून त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्मशानभूमीतील पीएनजीवर चालणाऱया चारही शवदाहिन्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. सरणावरील केवळ तीनच दाहिन्या असून, त्यांच्यावर मोठा ताण येत आहे. नवीन तीन लाकडी दाहिन्या तयार करण्याचा आराखडा कागदावरच आहे. अंत्यसंस्कारासाठी एकाच वेळेस पाच मृतदेह आले तर त्यांना दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात धुरामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीतील विविध समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली.