पीक विमा योजनेत गैरप्रकार; कोकाटेंची कबुली

बोगस शेतकऱयांची नावे दाखवून विम्याची रक्कम परस्पर अन्य खात्यात वळवणे, चुकीचे पंचनामे, शेतकऱ्यांचा आधारकार्ड क्रमांक घेऊन बोगस विमा उतरवणे अशा पद्धतीने बोगस प्रकरणांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात चेतन तुपे व अन्य सदस्यांनी शेतकरी नुकसानभरपाईबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याचे अंशतः खरे असल्याचे कृषिमंत्र्यांनी मान्य केले. पीक विमा उतरवण्याच्या संदर्भात निदर्शनास आलेल्या अयोग्य बाबींची तपासणी करून 2024 च्या खरीप हंगामात 4 लाख 45 हजार अयोग्य विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.