अभिनेत्री रान्या रावची 15 दिवसांनी दुबईवारी

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावर सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आल्यानंतर तिचे आता एक-एक कारनामे समोर येत आहेत. रान्या ही दर 15 दिवसांनी दुबईला जात असायची. रान्या वर्षभरात जवळपास 30 वेळा दुबईला गेली होती. एका दौऱ्यात ती 13 लाख रुपये कमवत असायची. तस्करी करण्यासाठी ती मोडिफाईड जॅकेटचा वापर करायची. तसेच बेल्टमधूनही सोने तस्करी करायची. तिकडून येताना तिने सोन्याची तस्करी केली की नाही याचा तपास आता अधिकारी करत आहेत.