अँड्रॉईडपेक्षा आयफोनला हिंदुस्थानींची डिमांड

हिंदुस्थानात अँड्रॉईड फोनपेक्षा आयफोनला हिंदुस्थानी लोकांची जास्त डिमांड आहे, अशी माहिती समोर आली आहे. रिसर्च फर्म आयडीसीच्या जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून अँड्रॉईड फोनच्या विक्रीत 10 टक्के घसरण झाल्याचे यात म्हटले आहे, तर आयफोनच्या विक्रीत 11.7 टक्के वाढ झाली आहे. हिंदुस्थानी ग्राहकांची आवड अँड्रॉईड फोनपेक्षा आयफोनमध्ये वाढत असल्याचेही यात म्हटले आहे.