
देशात कोट्यधीशांची संख्या 2024 मध्ये वाढली असून 10 मिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक संपत्ती असलेल्या हिंदुस्थानींची संख्या गेल्या वर्षभरात 6 टक्क्यांनी वाढून ती 85,698 इतकी झाली आहे. ग्लोबल ऍसेट कंसल्टंट नाइट फ्रँकने द वेल्थ रिपोर्ट 2025 हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान 2028 पर्यंत करोडपतींची संख्या 93,753 इतकी होण्याची शक्यता असल्याचेही नाइट फ्रँकने म्हटले आहे.
हिंदुस्थानी अब्जापतींची एकूण संपत्ती 950 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे, तर अमेरिकेतील अब्जापतींची एकूण संपत्ती 5.7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आणि चीनमधील अब्जापतींची एकूण संपत्ती 1.34 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजेच हिंदुस्थान या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानात 2024 मध्ये अरबपतींची एकूण संख्या 191 इतकी झाली आहे. उद्योग जगतात झालेली प्रगती आणि जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.