
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला आता तीन महिने होत आले आहेत. मात्र अद्याप एक आरोपी फरार आहे. तीन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या अमानुष छळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने एक व्हिडिओ जारी करत आपल्या वडिलांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला शोधून शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाली वैभवी देशमुख?
त्यांनी जे केलेलं अमानुष कृत्य आहे, त्याला तोंड नाही आज काही बोलायला. जी वेळ आमच्या कुटुंबावर आली आहे, ती इतर कुणावरही येऊ नये. माझे वडील शेवटी सुद्धा सांगतायत, मला माझ्या मुला-मुलींसाठी जगू द्या, माझ्या गावासाठी जगू द्या, मला माझ्या गावाला पुढे न्यायचंय. ते इतकी तळमळ व्यक्त करत असतानासुद्धा त्यांना कुणाचा वरच्याचा, वरच्या सरकारचा हात असल्याशिवाय ते असं करणं शक्य नाही आहे. त्यांची जी तळमळ होती ती गावासाठी होती, आमच्यासाठी होती. तरीपण त्यांनी त्यांचं न ऐकता त्यांना इतकं अमानुषपणे मारलं. याच्यामध्ये कुणाचा तरी प्रमुख हात आहे. हा नेमका हात कुणाचा आहे हे सरकारने शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना पण यामध्ये सहआरोपी करून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे.
View this post on Instagram