
मध्य प्रदेशातील बैतुल कोळसा खाणीत गुरुवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. स्लॅब कोसळल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. बैतुलचे एसपी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा आढावा घेत आहेत. गोविंद, हरी चौहान आणि रामदेव पंडौले अशी मयत कामगारांची नावे आहेत.