
अलीकडच्या काळात आपल्याकडे पाश्चात्यांचे खाणे खूपच लोकप्रिय होऊ लागले आहे. अर्थात यातील काही पदार्थ हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत यात वादच नाही. त्यामुळेच पाश्चात्यांच्या पदार्थांना आता आपल्याकडेही चांगलीच मागणी वाढलेली आहे. यामध्ये मुसळीचे महत्त्व सध्या खूप वाढलेले आहे.
मुसळी आपण नाश्ता तसेच दुपारचे जेवण म्हणून खाऊ शकतो. तसेच संध्याकाळच्या स्नॅकसाठी सुद्धा आपण मुसळी खाऊ शकतो. मुसळीसोबत आपल्याकडे आज अनेकजण बाजरी एकत्र करुन खाऊ लागले आहेत. त्यामुळे अतिरिक्त पोषकद्रव्ये देखील मिळतात. मुसळीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे खासकरून सकाळच्या नाश्त्यासाठी मुसळी हा उत्तम पर्याय मानला जात आहे. शिवाय पटकन तयार होणारा नाश्ता असल्यामुळे तरुणांमध्ये मुसळीची क्रेझ आहे.
मुख्य म्हणजे मुसळीमध्ये सँडविच किंवा डोनटच्या तुलनेत साखर आणि कॅलरी यात कमी असतात. तसेच मुसळी हे इतर तृणधान्यांपेक्षा निश्चितच आरोग्यदायी आहे. यामध्ये फायबर आणि धान्य जास्त असते. त्यामुळे पाचन तंत्र उत्तम राहते. तसेच बराच काळासाठी आपले पोट भरलेले राहते.
ओट्स हा एक महत्वाचा घटक मुसळीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
मुख्य म्हणजे मुसळीमध्ये नॉन-ग्लूटीनस अॅसिड फ्री बाजरी हे तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीज सारख्या पोषक द्रवांचा चांगला स्रोत आहे. तसेच मुसळी हा पौष्टिक संतुलित आहार मानला जातो.
हृदयाच्या समस्येचा धोका मुसळीचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणावर कमी होतो.
मुसळीची क्रेझ सध्या म्हणूनच आपल्याकडे वाढताना दिसत आहे. पोषक आहार घ्यायचा असेल तर मुसळी हा बेस्ट पर्याय म्हणुन तरुण खात आहेत.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)